कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरास WHO ची मान्यता

कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरास WHO ची मान्यता

Published by :
Published on

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने भारतात निर्मिती होणाऱ्या कोवॅक्सिन लशीला आपातकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेनं भारत बायोटेककडून लसीविषयी अतिरिक्त माहिती मागवली होती. ही माहिती तपासून पाहिल्यानंतर डब्ल्यूएचओने लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने याआधीच या लसीला मान्यता दिली आहे. भारतात कोवॅक्सिनचे डोस देण्यास याआधीच सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोवॅक्सिनचा वापर होण्यासाठी या लसीला डब्ल्यूएचओची मान्यता आवश्यक होती. गेल्या अनेक दिवसांपासून या मान्यतेची प्रतीक्षा सगळ्यांना लागली होती. अखेर ती मान्यता डब्ल्यूएचओनं दिली आहे.

कोवॅक्सिन कोरोनाविरोधात ७८ टक्के प्रभावी असल्याचं डब्ल्यूएचओनं स्पष्ट केलं आहे. तसेच दुसऱ्या डोसनंतर १४ दिवसांनंतर कोवॅक्सिन प्रभावी ठरते. त्याशिवाय, या लसीचे डोस साठवून ठेवण्याची प्रक्रिया सुलभ असल्यामुळे गरीब आणि विकसनशील देशांसाठी ही लस अतिशय उपयुक्त असल्याचं डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com