Mamata Banerjee Accident : “ममता बॅनर्जींवर हल्ल्याचे पुरावे नाहीत” – निवडणूक आयोग

Mamata Banerjee Accident : “ममता बॅनर्जींवर हल्ल्याचे पुरावे नाहीत” – निवडणूक आयोग

Published by :
Published on

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रचार रॅली दरम्यान अपघात झाला होता. यामध्ये त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. या फ्रॅक्चरनंतर ममता दीदींवर हल्ला झाल्याचा आरोप तृणमूलच्या नेत्यांनी केला होता. ममता बॅनर्जी यांनी देखील विरोधकांनी हल्ला केल्याचा दावा केला होता.

या कथित हल्ल्यानंतर जोरदार राजकारण रंगलं आहे. अखेर निवडणूक आयोगाने या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय. पण ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये हल्ला झाल्याचे कोणतेही पुरवे नसल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि अन्य दोन विशेष निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापत ही कुठल्याही हल्ल्यातून झाली नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com