निवडणुक आयोगाची वेबसाइट हॅक; उत्तरप्रदेशातुन लॉग-ईन

निवडणुक आयोगाची वेबसाइट हॅक; उत्तरप्रदेशातुन लॉग-ईन

Published on

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशात गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकीत होणारे गैरप्रकार समोर आले होते.अजूनही अशा तक्रारी येत असतात.कधी मतदारांच्या यादीविषयी तर कधी मतदानाच्या यंत्राविषयी.मात्र आता थेट निवडणूक आयोगाची वेबसाईट हॅक करून एका पठ्ठ्याने १० हजारांपेक्षा जास्त बनावट ओळखपत्र बनवले असल्याची बातमी समोर आली आहे.या प्रकरणात उत्तरप्रदेशातील सहारनपूर मधील विपुल सैनी नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,निवडणूक आयोगाच्या अधिकारयांचा पासवर्ड वापरून विपुल सैनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर लॉग इन करत होता.त्याच्या दुकानावर टाकलेल्या छाप्यातून पोलिसांनी एक हार्ड डिस्क आणि कम्प्युटर देखील जप्त केले आहे. विपुल सैनीने एका विद्यापीठातून बॅचलर्स ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशनची डिग्री मिळवली आहे.

दरम्यान, अवघ्या विशीत असणाऱ्या विपुल सैनीच्या खात्यामध्ये लाखो रुपये असल्याचं पोलिसांच्या तपासात आढळून आलं आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये विपुल सैनीनं हजारो ओळखपत्र बनवली. मात्र, या ओळखपत्रांचं तो काय करत होता किंवा करणार होता, याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.दरम्यान, अवघ्या विशीत असणाऱ्या विपुल सैनीच्या खात्यामध्ये लाखो रुपये असल्याचं पोलिसांच्या तपासात आढळून आलं आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये विपुल सैनीनं हजारो ओळखपत्र बनवली आहेत. मात्र, या ओळखपत्रांचं तो काय करत होता किंवा करणार होता, याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com