Dombivali Rape Case: आरोपीच्या विरोधात चार्जशिट दाखल करा, निलम गोऱ्हेंच्या पोलिसांना सूचना

Dombivali Rape Case: आरोपीच्या विरोधात चार्जशिट दाखल करा, निलम गोऱ्हेंच्या पोलिसांना सूचना

Published by :
Published on

डोंबिवलीतील अल्पवयीन तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आले होते. या संदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी पोलीस अधिकाऱ्याची , पिडीत तरुणी आणि तिच्या आई वडिलांची भेट घेतली आहे. या भेटी नंतर पत्रकार परिषदेत बोलताना गोऱ्हे यांनी पोलिसांनी  लवकरात लवकर आरोपीच्या विरोधात चार्ज शिट लवकर दाखल करावी. मुलीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन कसे करता येईल याबाबत सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

पोलिसांनी फार थोडय़ा काळात आरोपीना पकडले आहे. सर्व प्रकारची प्रक्रिया पोलिसांनी केली आहे. पिडीत मुलीची शिकण्याची इच्छा आहे. तिच्या ऑनलाईन शिक्षणासाठी काय करता  येईल. तिचे वडील या प्रकरणामुळे रोजगारावर जाऊ शकत नाही. त्यांना बाकीची कामाच्या संदर्भात मदत केली जाईल. या कुटुंबाला पोलिस चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या माध्यमातून मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सरकारच्या मनोधैर्य योजनेतून पिडीत कुटुंबाला येत्या पंधरा दिवसात मदत दिली जाईल अशी माहिती गोऱ्हे यांनी दिली आहे.

डोंबिवली प्रकरणातील मुलीच्या आई वडिलांनी मुलगी मिसिंग झाल्याची तक्रार केली होती. मात्र काही तासात  मुलगी परत आली होती. त्यामुळे त्यांची काही तक्रार नाही असे पालकांनी सांगितले होते .या पार्श्वभूमीवर वर्षभरात हरविलेल्या, अपहरण झालेल्या किंवा गायब झालेल्या मुली जर परत आल्या असतील तर या मुली सुरक्षित आहेत ना? त्याची माहिती  सामाजिक संघटनाच्या माध्यमातून घेत या मुली अडचणीत असतील तर महिला दक्षता समितीने इतर काही गटांना जोडून घेत या मुलीना आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी अशा सूचना  विधानपरिषद उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांना दिली आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com