Diwali
DiwaliTeam Lokshahi

यंदाच्या दिवाळीत बाजारातील तयार फराळाला अधिक मागणी

यंदा दिवाळीमध्ये बाजारातील फराळाची मागणी अधिक वाढू लागली आहे. घरात फराळ बनवण्यापेक्षा नागरिकांनी तयार फराळाला पसंती दर्शवली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

यंदा दिवाळीमध्ये बाजारातील फराळाची मागणी अधिक वाढू लागली आहे. घरात फराळ बनवण्यापेक्षा नागरिकांनी तयार फराळाला पसंती दर्शवली आहे.

खाद्यतेलांचे भाव प्रचंड वाढले असून अन्य वस्तूंच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याने यंदा दिवाळीचा तयार फराळही महागला आहे. त्यामुळे घरगुती फराळ कमी झाला असून तयार फराळ विकत घेण्यासाठी मागणी वाढली आहे साताऱ्यात यासाठी तयार फराळ करण्याची लगबग सुरू झाली आहे.

दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या डाळ, तेल, साखर, सुकामेवा आदींच्याही किमती वाढल्यामुळे तयार फराळाच्या दरामध्येही 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीचा भार आता ग्राहकांच्या खिशाला बसल्याने महिलावर्गाकडून तयार फराळ घेतला जात आहे.

यंदाचे फराळाचे दर पाहुयात-

भाजणी चकली : 400 रुपये प्रतिकिलो

तिखट शेव : 380 रुपये प्रतिकिलो

बेसन लाडू: 600 ते 750 रुपये प्रतिकिलो

रवा लाडू: 600 रुपये प्रतिकिलो

करंजी (रवा सारण): 700 रुपये प्रतिकिलो

करंजी बेसन सारण) : 750 रुपये प्रतिकिलो

शंकरपाळे : 450 रुपये प्रतिकिलो

काही ठिकाणी लाडू, करंजी हे नगावर मिळत असून एक नग 25 ते 30 रुपयाला आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com