Lakshmi Pujan Wishes: दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर प्रियजनांना पाठवा लक्ष्मीपूजनाच्या खास शुभेच्छा
दिवाळी सणाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. आश्विन अमावस्येला दीपावली सण साजरा केला जातो. यंदा लक्ष्मी पूजन १ नोव्हेंबरला केले जाणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीगणेशाची पूजा केली जाते. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीपासून दिवाळीला सुरुवात होते. या दिवशी लक्ष्मी-गणेश, कुबेर आणि माता सरस्वती यांची विशेष पूजा केली जाते. तसेच या दिवशी झाडू, बत्ताशे, धन-धान्य, कलश यांना देखील महत्त्व असते. या शुभ दिवशी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या प्रियजनांनवर अशीच टिकून राहण्यासाठी आपल्या प्रियजनांना द्या या मंगलमय शुभेच्छा
दिव्यांचा हा सण आहे खास
तुम्हाला मिळो सुखांचा सहवास
लक्ष्मी आली आपल्या द्वारी,
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महालक्ष्मीचे करुनी पूजन,
लावा दीप अंगणी
धनधान्य आणि सुख-समृद्धी,
लाभेल तुम्हा जीवनी
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख-समृद्धीने भरू दे
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीची होईल कृपा एवढी,
सगळीकडे होईल नाव
दिवसरात्र व्यापारात वाढेल तुमचे काम
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दिव्याचा प्रकाश, फटाक्यांचा आवाज,
सूर्यकिरण, आनंदाचा वर्षाव,
चंदनाचा सुगंध, प्रियजनांचे प्रेम
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!