Laxmipuja Healthcare: देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या झेंडूचे हे गुणकारी फायदे माहित आहेत? जाणून घ्या

Laxmipuja Healthcare: देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या झेंडूचे हे गुणकारी फायदे माहित आहेत? जाणून घ्या

आज आहे लक्ष्मीपूजन. जीवन यथार्थ पद्धतीने जगण्यासाठी जे काही आवश्यक असतं, ते सगळं देणाऱ्या लक्ष्मी मातेची आपण पूजा करतो आणि ही पूजा करताना अगदी हमखास वापरलं जाणार फुल म्हणजे झेंडूचं फुल.
Published by :
Team Lokshahi
Published on

आज आहे लक्ष्मीपूजन. जीवन यथार्थ पद्धतीने जगण्यासाठी जे काही आवश्यक असतं, ते सगळं देणाऱ्या लक्ष्मी मातेच्या पूजनाचा आजचा दिवस. संपत्तीला प्रतिनिधित्व करणारं ते धन असल्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातलं सोनं, नाणं, दाग दागिने, पैसे यांची आपण पूजा करतो आणि ही पूजा करताना अगदी हमखास वापरलं जाणार फुल म्हणजे झेंडूचं फुल. झेंडूच्या फुलांचा रंगच इतका छान केशरी असतो की, ते नुसतं बघितलं तरी मनात उत्साह जाणवल्याशिवाय राहत नाही.

झेंडूचं झाड हे किडे, किटक आणि इन्फेक्शन ला दूर ठेवणारे असतात, म्हणूनच अनेक शेतकरी शेताच्या बांधावर, विशेषतः भाज्या वगैरे लावलेल्या असतील तर त्याच्या कडेला झेंडू आवर्जून लावतात. याशिवाय औषधातही झेंडू वापरला जातो. मूळव्याधमुळे रक्तस्त्राव होत असेल तर त्यावर झेंडूची फुलं वापरता येतात. झेंडूच्या फुलापासून त्याच्या पाकळ्या वेगळ्या कराव्यात, थोडंसं पाणी टाकून मिश्रणाच्या मदतीनी त्या वाटाव्यात, नंतर सुती कापडातून गाळून रस काढावा. दोन चमचे रसात, दोन चमचे तूप मिसळून घ्यावा, सकाळ संध्याकाळ हा उपाय केल्यानी साधारण दोन-तीन दिवसात रक्त पडण्याचा थांबतो.

मॉडर्न रिसर्चमध्ये सुद्धा झेंडूची फुलं प्रतिजैविक, विरोधी दाहक, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, कीटकनाशक म्हणून काम करतात असं दिसून आलं आहे. जखम शुद्ध करण्यासाठी आणि ती नीट भरून येण्यासाठी मदत करणारी असतात असही सिद्ध झालेलं आहे. लक्ष्मीपूजनाच्या आजच्या या दिवशी झेंडूची फूलं वाहून लक्ष्मीची पूजा करू या आणि तीच्या आशिर्वादानी सुख समृद्धीनी परिपूर्ण जीवन जगु या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com