Diwali Laxmipuja: देवी लक्ष्मीला घुबड वाहन कसे मिळाले? जाणून घ्या
दिवाळी सणाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. आश्विन अमावस्येला दीपावली सण साजरा केला जातो. यंदा लक्ष्मी पूजन १ नोव्हेंबरला केले जाणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीगणेशाची पूजा केली जाते. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीपासून दिवाळीला सुरुवात होते. या दिवशी लक्ष्मी-गणेश, कुबेर आणि माता सरस्वती यांची विशेष पूजा केली जाते. तसेच या दिवशी झाडू, बत्ताशे, धन-धान्य, कलश यांना देखील महत्त्व असते. लक्ष्मी ही तेजस्वी आणि शुभ कार्याची जननी आहे. पण तिला मिळालेल्या वाहनाचा विचार केला तर एक प्रश्न मनात येतो तो म्हणजे देवी लक्ष्मीला घुबड हे वाहन का मिळाले असेल? घुबडाला तसं म्हणायला गेलं तर अशुभ मानले जाते. मात्र तोच घुबड देवी लक्ष्मीचा वाहन कसा काय झाला असेल याचा कधी विचार केला आहे का? चला तर मग जाणून घेऊयात देवी लक्ष्मीला घुबड हे वाहन कसे मिळाले...
"सार जग जे पाहू शकत नाही ते घुबड पाहू शकतो" असं म्हटलं जाते. घुबडाला संकटाआधीच येणाऱ्या संकटाची चाहूल लागते त्यामुळे त्याला अशुभ मानले जाते. त्यामुळे घुबड दिसताच त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. धर्मिक मान्यतेनुसार सगळे देवी देवता हे आपले वाहन निवड करत होते. त्यावेळी देवी लक्ष्मीला आपल्यासाठी कोणता वाहन उत्तम ठरेल हा प्रश्न पडला होता. कारण, देवी लक्ष्मी ही पाताळ, दुर्गम आणि अंधकाराच्या ठिकाणी जाते आणि तिथे आपल्या तेजाने मंगलमयी प्रकाश आणि तेज निर्माण करते. सगळे प्राणी पक्षी देवी लक्ष्मीला त्यांचा वाहन करण्यासाठी आग्रह धरू लागले.
त्यावेळी देवी लक्ष्मी म्हणाली होती, कार्तिक महिन्याच्या अमावास्या तिथी आल्यावर सगळीकडे गडद अंधार होतो. त्यादिवशी जो प्राणी किंवा पक्षी अंधाऱ्या रात्री माझ्या जवळ येईल त्याला मी माझा वाहन करेन. सगळे प्राणी पक्षी देवी लक्ष्मीकडे जाण्यासाठी सज्ज झाले. कार्तिक महिन्याच्या अमावास्येला सर्वत्र अंधकार असल्यामुळे सर्व प्राण्यांना निट काही दिसत नव्हत, मात्र घुबडाला रात्रीचे स्पष्ट दिसत असल्यामुळे घुबड देवी लक्ष्मीकडे सर्व प्राणी पक्ष्यांच्या आधी पोहचला आणि घुबडाला देवी लक्ष्मीचा वाहन बनण्याचा मान मिळाला. घुबडाला सुबत्ता व आर्थिक समृद्धीचे प्रतीक समजलं जातं. तसेच दिवाळीच्या दिवशी घुबडाचं दर्शन झाले, तर ते शुभ समजलं जाते.