Diwali 2024: दिवाळीला कारिट फोडण्यामागचे 'हे' आहे कारण; जाणून घ्या...
दिपावली पाडवा नुकत्याच काही दिवसांवर येऊन ठेपला आह. हिंदू धर्मात दिवाळीला फार महत्त्व आहे तसेच दिवाळी सण अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करताना पाहायला मिळतो. दिवाळीत सर्वत्र प्रकाशमय वातावरण पाहायला मिळते तसेच दाराबाहेर दिव्यांची आरास, रांगोळी तसेच कंदील आणि फटाके फोडले जातात.
यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या दिवसांमध्ये दिवाळी साजरी केली जाणार आहे. 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. तर, 3 नोव्हेंबरला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. तसेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नानानंतर कारिट हे फळ फोडण्याची परंपरा हिंदू धर्मात आहे. तसेच कारिट फोडताना ते पायाच्या अंगठ्याने फोडले जाते तसेच त्याची एक बी कपाळाला लावली जाते आणि त्यातून येणारा चिकट पदार्थ जीभेला लावला जातो.
पण दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नानानंतर कारिट का फोडले जाते माहित आहे का? जाणून घ्या. पौराणिक आणि धार्मिक मान्यतेनुसार कारिट हे नरकासुर म्हणून मानले जाते आणि या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते. यामुळे या दिवशी कारिट फोडून आपल्यातल्या वाईट वृत्तीचा नाश करून चांगल्या गोष्टींची सुरुवात करणे हा या गोष्टीचा अर्थ आहे.