डिजिटल पेमेंटच्या सुरक्षेसाठी RBI ने जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना
देशातील डिजिटल पेमेंटमध्ये सुरक्षता आणि बळकटी येण्यासाठी RBI ने नवीन नियम जारी केला आहे. ऑनलाईन फसवणूकीच्या वाढत्या घटनांमुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंटची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी बँक आणि कार्ड जारी करणार्या संस्थांना मुख्य निर्देश जारी केले.
आरबीआयने पेमेंट सिक्युरिटीचे नियम कठोर केले आहेत. मास्टर डायरेक्शनमध्ये इंटरनेट बँकिंग सुविधा, मोबाइल बँकिंग पेमेंट्स, कार्ड पेमेंट्स, ग्राहकांचे हित जपणे आणि तक्रार हाताळणे यांचा समावेश आहे. मास्टर डायरेक्शन शेड्यूल्ड कमर्शियल बँक, स्मॉल फायनान्स बँक, पेमेंट बँक आणि एनबीएफसी जारी करणार्या क्रेडिट कार्डवर लागू असतील.
डिजिटल व्यवहारासाठी थर्ड पार्टी अॅप्स वापरणार्या बँकांना अॅप्स व्यवहारांसाठी सुरक्षित आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी एस्क्रोमध्ये सोर्स कोड ठेवावा लागेल. सर्व संस्थांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी RBI ने 6 महिन्यांचा अवधी दिला आहे.