भारतात लवकरच ‘डिजिटल करन्सी’ लागू करण्यात येणार

भारतात लवकरच ‘डिजिटल करन्सी’ लागू करण्यात येणार

Published by :
Published on

संपूर्ण जगात डिजिटल करन्सीचा वापर वाढू लागल आहे. आता भारतात देखील नवीन तंत्रज्ञान प्रणालीचा अवलंब होत असल्याचे दिसत आहे. तसेच देशात आता टप्प्याटप्प्याने डिजिटल करन्सी लागू करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. आरबीयाचे डेप्युटी गव्हर्नर टी. शंकर यांनी नुकतच भारतातही डिजिटल करन्सी लागू करायला हवी असं वक्तव्य केलं होतं.

यामुळे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता सेंट्रल बॅंक डिजिटल करन्सी (CBDC) अंतर्गत देशात डिजिटल करन्सी सुरु करण्याची तयारी करत आहे. भारतात लागू करण्यात येणारी डिजिटल करन्सी ही क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन प्रमाणेच असणार आहे. मात्र बिटकॉईनपेक्षा आधिक पारदर्शक व कायदेशी व्यवहार या करन्सीमध्ये असणार आहे. सध्या आरबीआय या मोहीमेवर असून या धोरणांवर काम करत आहे.लवकरच याचे नियम व अटी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com