धुळ्यात खासगी ट्रॅव्हल्सच्या व्यवस्थापकाला बेदम मारहाण

धुळ्यात खासगी ट्रॅव्हल्सच्या व्यवस्थापकाला बेदम मारहाण

Published by :
Published on

धुळे शहरातील खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या व्यवस्थापकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कमलाबाई हायस्कूल परिसरात ही घटना घडली आहे. खंडणी आणि दरोडा टाकण्याच्या हेतूने गुन्हेगारांनी हौदोस मांडला होता.

आकाश शेळके असे व्यवस्थापकाने नाव असून त्याच्यावर शस्त्राने वार करण्यात आला. त्यासह अजून एक कर्मचारी गंभीर जखमी आहे. त्यांना धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सध्या दाखल करण्यात आले आहे. संपूर्ण घटना ही CCTV कॅमेऱ्यात कैद झालीय. ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com