कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लस घेतल्यानंतरही डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोनाची लागण होऊ शकते
कोविशिल्डचे आणि कोवॅक्सिनचे दोन लस घेतल्यानंतरही डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोनाची लागण होऊ शकते, असे AIIMS ने इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अॅन्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी आणि नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल या संस्थांच्या सहाय्याने अभ्यास केला आहे. या अभ्यासामध्ये ब्रेक थ्रु इन्फेक्शन असलेल्या ६३ लोकांचा समावेश करण्यात आला होता. या ६३ लोकांपैकी, ३६ लोकांना कोरोना लसीचे दोन डोस तर २७ लोकांनी कोरोनाचा एकच डोस घेतला होता. त्यापैकी ५१ पुरूष आणि १२ महिला असून ६३ लोकांपैकी १० लोकांना कोव्हॅक्सिनचा तर ५३ लोकांना कोविशिल्डचा लस देण्यात आले होते.
लस घेणारे ६० टक्के तर एक लस घेणारे ७७ टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटची लक्षण दिसली आहेत. या दोन्ही लसी या डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहेत, पण त्याचे प्रमाण कमी असल्याचं AIIMS या संस्थांचे अभ्यासात सांगण्यात आलं आहे.
असा प्रकारे पडले नामकरण
दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना विषाणूचे नामकरण केलं आहे. भारतात सापडलेला B.१.६१७.१ हा कोरोना व्हेरिएंट 'कप्पा' आणि B.१.६१७.२ हा व्हेरिएंट आता 'डेल्टा' या नावाने ओळखला जाणार आहे. हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या ४४ हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे.