Covid-19 updates
Maharashtra Corona : मृतांचा आकडा वाढला, 59 हजार नवे कोरोनाबाधित!
लसीकरणावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये राजकीय वाद सुरू झालेला असताना राज्यात कोरोना स्थित गंभीर होताना दिसत आहे. आज राज्यात 58 हजार 993 नवे कोरोनाबाधित आढळले असून 301 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.
सध्याच्या घडीला राज्यात 5 लाख 34 हजार 603 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात तब्बल 301 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा 57 हजार 329 वर गेला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 58 हजार 993 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या सर्व परिस्थितीमध्ये राज्यात आज 45 हजार 391 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत ही दिलासादायक बाब ठरली आहे. तर आतापर्यत एकूण 26 लाख 95 हजार 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.