लता मंगेशकरांचे स्मारक उभारण्याच्या मागणीला दादरवासीयांचा विरोध
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून लतादीदींना श्रद्धांजली वाहत आहेत.
या पार्श्वभूमीवर दादरवासीय मात्र या मागणीला विरोध करत आहेत. शिवाजी पार्क मैदानाची स्मशानभूमी करू नका, अशा भावना व्यक्त होताना दिसत आहेत.दादरवासियांना शिवाजी पार्कच्या मैदानाला खूप महत्त्व आहे. लता मंगेशकर यांच्याबद्दल त्यांना आदर आहे. मात्र, त्यांच्या पार्थिवावर मैदानात झालेल्या अंत्यसंस्कारबद्दल अनेकांना आवडले नाही.
वास्तुशास्त्रज्ञ आणि नगररचनाकार नंदन मुणगेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली की, शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे. त्याचा वापर खेळण्यासाठीच व्हायला हवा.मात्र, खेळाची मैदाने अन्य कारणांसाठी वापरण्यात येत असतील तर ते योग्य नाही. लता मंगेशकर यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षितता, गर्दी या बाबी लक्षात घेऊन मैदानात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले हे ठिक होते. पण, तेथेच अंत्यसंस्कार करणे योग्य नाही. मैदानात लहान मुले खेळण्यासाठी येतात, ही बाब लक्षात घ्यायला हवी होती'',
'मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले, 'दादरवासीयांनी अतिक्रमणापासून शिवाजी पार्क मैदान वाचवले आहे. हे मैदान खेळासाठी आहे आणि ते खेळासाठीच राहू द्यावे. राजकारणासाठी मैदानाचा बळी घेऊ नये'',