crude price निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेल २५ रुपयांपर्यंत महागणार
रशिया-युक्रेन युद्धामुळे (russian ukraine war)कच्च्या तेलाचे दर रेकॉर्ड स्तरावर आहेत. शनिवारी क्रूड तेलाचे (crude oil)118 डॉलर प्रति बॅरलवर गेलं आहे. हा मागील सात वर्षातील हा सर्वोच्च दर आहे. महागड्या क्रूड ऑइलनंतर सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) जारी केले आहे.
भारतात इंधन दर गेल्या १२० दिवसापासून स्थिर आहेत. मात्र, पाच राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर पुढील आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल दरात २५ रुपयांची वाढ होऊन ते प्रति लिटर १३५ रुपयापर्यंत जाणार आहे.
गेल्या नोव्हेंबरपासून तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price Hike) वाढ केली नाही. त्यामुळे तेल कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. इंधनावरील कंपन्यांचे मार्जिन उणेवर गेले आहे. त्याला प्रतिलिटर विक्रीतून 1.54 रुपये तोटा सहन करावा लागत आहे.
मुंबईत पेट्रोल किंमत सर्वाधिक 110 रुपये प्रति लीटर जवळपास आहे.