क्रेडिट कार्डचे बील EMI ने भरताय? मग लक्षात ठेवा!

क्रेडिट कार्डचे बील EMI ने भरताय? मग लक्षात ठेवा!

Published by :
Published on

क्रेडिट कार्डचे बील तुम्ही मासिक हप्त्यामध्ये देखील भरू शकता. पण बील भरण्यासाठी जर तुम्ही EMI चा पर्याय निवडत असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

  • क्रेडिट कार्ड बील निश्चित वेळेआधी भरले तर कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही. मात्र जर बिलाची रक्कम EMI मध्ये बदलली तर बँकेला व्याज द्यावे लागते.
  • EMI द्वारे क्रेडिट कार्ड बील भरायचे असेल तर काही प्रकारचे शुल्क द्यावे लागतात. यामध्ये व्याजाशिवाय प्रोसेसिंग फी, प्रीपेमेंट चार्ज आणि जीएसटी देखील आकारला जातो.
  • EMI चा पर्याय निवडताना शक्यतो कमी कालावधीचा निवडावा, कारण दीर्घ कालावधीसाठी तुम्हाला अधिक रक्कम चुकती करावी लागू शकते-त्यावर व्याज अधिक आकारले जाते.
  • क्रेडिट कार्ड होल्डरला हे ध्यानात घेणे आवश्यक आहे क्रेडिट कार्ड बील तुम्ही आपात्कालीन परिस्थितीतच EMI मध्ये बदला किंवा तुम्हाला बील भरणे अजिबात शक्य नसेल तर. अन्यथा तुम्हाला अधिक खर्च करावा लागू शकतो.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com