COVID-19 Effect: केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, पुढील आदेशापर्यंत दिल्लीतील सर्व शाळा बंद

COVID-19 Effect: केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, पुढील आदेशापर्यंत दिल्लीतील सर्व शाळा बंद

Published by :
Published on

देशात कोरोना रुग्णाचा उद्रेक होत आहे. याचा पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खबरदारी म्हणून दिल्लीतील सर्व शाळा (शासकीय, खाजगी) पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

याबाबतची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून दिली आहे. दरम्यान, दिल्लीत येत्या सोमवारपासून सहाव्या सेरो सर्वेक्षणचे काम सुरू होणार आहे. सहाव्या सर्वेक्षणात 28 हजार नमुने 272 प्रभागांत घेण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रभागातील 100 लोकांचे नमुने गोळा करण्याची योजना आहे. केवळ अशाच लोकांचा या सर्वेक्षणात समावेश आहे ज्यांना लस देण्यात आली आहे.

यापूर्वी पाचवा सेरो सर्वेक्षण जानेवारीत करण्यात आले होते. त्यातच दिल्लीच्या निम्म्याहून अधिक लोकांमध्ये कोरोनाची लागण झाली. पाचवा सर्वेक्षण 15 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान घेण्यात आला. त्यात एकूण 28000 लोकांचे नमुने घेण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com