सीताराम येचुरी यांचा मुलाचा कोरोनामुळे मृत्यू

सीताराम येचुरी यांचा मुलाचा कोरोनामुळे मृत्यू

Published by :
Published on

मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचे पुत्र आशिष येचुरी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ते 35 वर्षांचे होते. सीताराम येचुरी यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली आहे. "कोरोनामुळे आज सकाळी माझा मोठा मुलगा आशिषचा मृत्यू झाला आहे. या कठीण काळात आम्हाला आशा दाखवणाऱ्या आणि आशिषची काळजी घेणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो." अशा शब्दात त्यांनी त्याचे दु;ख व्यक्त केले आहे.

त्यांच्यावर गुडगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तसंच त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती. मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षानं आशिष यांच्या मृत्यूवर वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे. त्यात म्हटलंय, "सीताराम येचुरी आणि इंद्रायणी मजुमदार यांचा मुलगा आशिष यांच्या मृत्यूमुळे आम्हाला दु:ख झालंय. याप्रसंगी पक्ष येचुरी कुटुंबीयांसोबत आहे."

आजकाल नेते नियम मोडून आपल्या बाळाच्या जोरावर त्यांच्या नातेवाईकांना लस उपलब्ध करून देते आहेत, तर दुसरीकडे सीताराम येचुरी मोठा नेते मात्र कोणतेही नियम न मोडता करोनाशी सामना करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com