कोरोनाचा आलेख चढाचं; 7 हजार 863 नवे कोरोना रुग्ण
राज्यात आज 7863 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6332 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2036790 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 79093 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.89% झाले आहे.
राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतचं चालली आहे. 8 हजाराच्या पल्ल्यावरून घसरलेली आकडेवारी सोमवारी 6 हजारावर आल्यानंतर आज मंगळवारी पुन्हा नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येने 8 हजाराच्या पल्ल्यानजीकचा आकडा गाठला. आज 7 हजार 863 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आलेल्या आकडेवारीच्या तुलनेत हा आकडा किंचितस कमी झाला आहे. मात्र तरीही आकडेवारी प्रशासन व आरोग्य विभागासाठी चिंताजनक आहे.
आज दिवसभरात राज्यात 7 हजार 863 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी हाच आकडा 6 हजार 397 च्या घरात होता. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत आज 1500 जास्त रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान जर अशीच आकडेवारी वाढत राहिली तर प्रशासन संचारबंदी अथवा लॉकडाऊन सारखे कठोर निर्बध लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज 6 हजार 332 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 20 लाख 36 हजार 790 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) 93.89% टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 79 हजार 093 इतकी आहे. जर अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येचा आलेखही वाढताच राहिल.