Corona Virus | राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा
दिवसेंदिवस कोरोना रूग्णाच्या संख्येत वाढ होत आहे, अशातच राज्यातील रेमडेसिविर इंजेक्शनसाठी मेडिकलसमोर लागलेल्या रांगा सर्वांचीच चिंता वाढवत आहेत. सरकारही या इंजेक्शनचा पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे, पण निर्मात्यांवरच काही मर्यादा आहेत, ज्यामुळे तत्काळ पुरवठा वाढवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
यामध्ये महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही रेमडेसिविरचा प्रचंड तुटवडा आहे. देशातील सध्या कोरोना रुग्णाचे प्रमाण १० लाखांच्या पुढे गेल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रालाच दररोज ४० ते ५० हजार रेमडेसिविर लागतात.
केंद्र सरकारने मायलन, हेटरो हेल्थकेअर, ज्युबिलंट लाईफ सायन्सेस, डॉ. रेड्डी लॅबोरेटरी, सिप्ला, झायडस कॅडिला आणि सन फार्मा या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. या कंपन्यांना ३१.६ लाख इंजेक्शन प्रति महिना एवढं लक्ष्य देण्यात आले आहे.