कोरोनाचा उद्रेक;राज्यात 25 हजार 833 नवीन रुग्णसंख्या
राज्यात लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू लागू करण्यासारखी परीस्थिती असताना देखील नवीन रुग्णसंख्येचा आकडा नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही आहे. आज तब्बल 25 हजार 833 नवीन रुग्णसंख्या आढळून आली आहे. पुन्हा रुग्णवाढी नंतरचा हा सर्वात मोठा रुग्णाचा आकडा आहे. त्यामुळे राज्य शासनासह आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.
राज्यात आज दिवसभरात 25 हजार 833 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता 23 लाख 96 हजार 340 वर पोहोचली आहे. तर आज 58 रूग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. आतापर्यंत राज्यात 53 हजार 138 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.२२ टक्के एवढा झालेला आहे.
सध्या राज्यात 1 लाख 66 हजार 353 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.आज 12 हजार 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 21 लाख 75 हजार 565 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 90.79 टक्के इतके झाले आहे.