Vidharbha
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली; वाचा सविस्तर
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) चांगल्या कमाईसाठीचा एकमेव मार्ग म्हणजे, सोयाबीनला चांगला भाव मिळणं. दरम्यान, वाशिम (Washim) जिल्ह्यात सोयाबीनचा भाव मागील साधारण 15 दिवसांपासून सात हजार तीनशे रुपयांच्या आसपास येऊन स्थिरावला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता.
मात्र आता ह्याच सोयाबीनची (Soyabean) किंमत मागील 3 दिवसांत 300 रूपयांनी घसरली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होईल ह्या अपेक्षेने ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले होते त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक व्यापाऱ्यांनीही सात हजार तीनशे रुपयांना सोयाबीन मोठ्या प्रमाणावर खरेदी करून ठेवला होता. त्यामुळे, आता त्या व्यापाऱ्यांची धाकधूकही वाढू लागली आहे.