कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

Published by :
Published on

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे कोरोनाबाधित झालेल्या हजारो रुग्णांना आपले प्राण गमावावे लागले. दरम्यान, कोरोनाबळी ठरलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर केंद्राने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाई देऊ शकत नाही, असे म्हटले होते. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे.

कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मोठा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबास नुकसान भरपाई मिळावी, पण ही रक्कम किती असेल याचा निर्णय केंद्र सरकार घेईल. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाईची किती रक्कम देण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ६ आठवड्यांच्या आत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश दिले. कोरोना मृत्यूंच्या नुकसान भरपाईसाठी याचिकेत ४ लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com