मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या बालपणीच्या शिक्षिकेचे 92 व्या वर्षी निधन

मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या बालपणीच्या शिक्षिकेचे 92 व्या वर्षी निधन

Published by :
Published on

संदिप गायकवाड, वसई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackery) यांच्या बालपणीच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. सुमन रणदिवे ह्या मागच्या 2 वर्षांपासून आपल्या वृद्धपकाळात वसईच्या आश्रमात राहत होत्या.त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackery) यांना शिक्षणाचे धडे दिले होते.

सुमन रणदिवे या दादरच्या बालमोहन महाविद्यालयात शिक्षिका होत्या. मागील वर्षी झालेल्या वादळात सुमन रणदिवे हे रहात असलेल्या वृद्धाश्रमातील सर्व पत्रे उडाले होते.त्यानंतर ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर राज ठाकरे (MNS Chief Raj Thackery) आणि उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपल्या कार्यकर्त्यांकरवी मोठ्या प्रमाणावर या आश्रमाला मदत केली होती. तेव्हापासून सुमन रणदिवे या प्रकाशझोतात आल्या होत्या. सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राज ठाकरे (MNS Chief Raj Thackery) यांच्यासहित अनेक राजकारणी आणि मुंबईकरांना शिक्षणाचे धडे दिले होते.

वसईच्या सत्पाला येथील न्यु लाईफ फाउंडेशन या वृद्ध आश्रमात त्यांनी रात्री 8 वाजता वयाच्या 92 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे.सुमन रणदिवे ह्या मागच्या 2 वर्षांपासून आपल्या वृद्धपकाळात वसईच्या आश्रमात राहत होत्या.आज त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी विरार सतपाला येथे करण्यात आला आहे.आश्रमाचे संचालक राजेश फ्रान्सिस मोरो यांनी सुमन रणदीवे यांना आज अग्नी दिला आहे. सुमन रणदीवे यांची ही इच्छा होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com