कार्यालयीन वेळेची मानसिकता बदलण्याच गरज, धोरण आखण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

कार्यालयीन वेळेची मानसिकता बदलण्याच गरज, धोरण आखण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

Published by :
Published on


कोरोनाचे संकट पुन्हा एकदा गहिरे होत चालले आहे. ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विशिष्ट कार्यालयीन वेळेत बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय धोरण आखण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे नीती आयोगाची सहावी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थिती मांडली. कार्यालयीन वेळच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोविड काळातही राज्य शासनाने विकास थांबविला नाही, आलेल्या संकटावर मात करीत आम्ही मार्ग काढत होतो. आम्ही आपत्तीला संधीमध्ये बदलवीत आहोत. गेल्या वर्षभरात आपण माहिती तंत्रज्ञानावर भरपूर भर दिला असून इंटरनेट सुविधा सर्व गावांमध्ये पोहचवणे आमचे उद्दिष्ट्य आहे. भारतनेटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा जाळे पसरविणे सुरू असले तरी अजून दुर्गम भागातील 2500पेक्षा जास्त गावे व खेड्यांमध्ये इंटरनेट व मोबाईल जोडणी पोहचलेली नाही. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून ही सुविधा राज्याला लवकरात-लवकर कशी मिळेल ते पाहावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com