चीन,रशिया कोरोना पुन्हा डोकवर काढतो

चीन,रशिया कोरोना पुन्हा डोकवर काढतो

Published by :
Published on

सणासुदीच्या काळात लोक निष्काळजी आहेत जे चिंताजनक आहे. ही निष्काळजीपणा सध्या प्रत्येकाला महागात पडू शकतो. लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे .कोरोना अजून आपल्या मधून गेलेला नाही. चीन आणि रशियातील कोरोना कोरोनाने पुन्हा एकदा आपला रंग दाखवला आहे. रुग्णांच्या मृत्यू संख्येत मोठी वाढ झाली आहे. चीनमध्ये शनिवारी ३८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर रशियात कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे.

रशियात गेल्या २४ तासांत तब्बल ३७,६७८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे १०७५ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात मृत्यू झालेली ही सर्वाधिक आकडेवारी आहे. मृत्यूची नोंद झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सरकारच्या कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३७,६७८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर सप्टेंबरच्या अखेरपर्यंत नोंदविण्यात आलेला दैनंदिन मृत्यूदर जवळपास ३३ टक्क्यांहून अधिक आहे. तर गेल्या महिन्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार रुग्णसंख्येत जवळपास ७० टक्क्यांची वाढ झाली आहे.

चीनची राजधानी बिजिंगमध्ये शनिवारी कोरोनाचे एकूण ९ रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरात कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात अली आहे . प्रशासनाने चाचण्याचं प्रमाण वाढवलं आहे आणि हॉटेलमधील बुकिंग रद्द करण्यात येत आहेत. बिजिंगमध्ये पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण मंगोलियाच्या स्वायत्त भाग, निंग्शिया आण शांक्सी प्रांतात प्रवास करुन आले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com