shivaji maharaj jayanti
shivaji maharaj jayanti

Video लोकशाही मीडिया पार्टनर : जपानमध्ये शिवजयंतीसाठी पोहचला शिवरायांचा पुतळा

Published by :
Jitendra Zavar
Published on

महाराष्ट्रासह सगळ्या भारतभर शिवजयंतीचा (shivaji maharaj jayanti)महाउत्सव साजरा होत असताना जपानमध्ये 21 मार्च 2022 रोजी शिवजन्मोत्सवाचा एक ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. भारत-जपानच्या (india-japan )70 वर्षांच्या संबंधामध्ये पहिल्यांदाच जपानमध्ये शिवजयंती (shivaji maharaj jayanti)साजरी होत आहे.
भारत कल्चरल सोसायटी जपान या जपानमधील संस्थेने लोकशाही चॅनलला मीडिया पार्टनर केली. भारत कल्चरल सोसायटीने यावर्षीपासून दरवर्षी जपानमध्ये शिवजयंती (shivaji maharaj jayanti)साजरी करण्याचा संकल्प केला आहे. भारतीय मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणे, त्यावर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित करणे आणि सार्वजनिक शिवजयंती साजरी करणे असे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

महाराजांचा अर्धाकृती पुतळा जपानमध्ये
टोकियोमधील राधागोविंद मंदिरामध्ये जपानमध्ये पोहचलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचा दुग्धभिषेक आणि रीतसर पद्धतीने विधिवत पूजा करून शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेचे संदिप गुंडप, अमोल शेलार, नवनीत सिसोदिया, नागभूषण वैद्य, रोहन अग्रवाल, मुकेश गुप्ता, विकास रंजन, महेश पिंपरीकर, निखिल मयेकर, राजेश आवाके, प्रदीप शरण, विशाल देशपांडे, कुशेन्द्र चौधरी, ओमसाई गुप्ता इ. सदस्य उपस्थित होते. अभिषेक आणि पूजेचा विधी विकास काळे यांनी पार पाडला.
प्रश्नमंजूषा स्पर्धा
शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेलासुद्धा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटात सुमारे 215 स्पर्धकांनी भाग घेतला. शिवाजी महाराजांना मराठी माणसापुरते मर्यादित न ठेवता सर्व भाषिकांना त्यांचा इतिहास माहिती व्हावा हा उद्द्येश यातून साध्य झाला.
21 मार्च रोजी होणार शिवजयंती
कोरोना परिस्थिती अजून नियंत्रणात नसल्यामुळे जरी हा कार्यक्रम थोडक्यात झाला असला तरी 21-मार्चला, ज्या दिवशी तिथीनुसार शिवाजी महाराजांची जयंती आहे त्या दिवशी टोकियोमध्ये शिवजयंतीचा सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होणार आहे. बाल शिवाजीचा पाळणा, पोवाडे, लेझीम, शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक अशा पारंपरिक प्रस्तुतीसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
भारत कल्चरल सोसायटी जपान या संस्थेने जपानमधील भारतीय दूतावास, हिंदू स्वयंसेवक संघ, टोकियो मराठी मंडळ, शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com