देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन

देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन

Published by :
Published on

तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

भारतीय लष्कराची दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेत आतापर्यंत 13 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकजण गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत गंभीर जखमी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात बिपीन रावत यांच्या पत्नी, पायलट यांच्यासह 9 जण त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. या सर्व जणांचा या अपघातात मृत्यू झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com