CBSE, ICSE 12th Exam SC Hearing|12 वी ची परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेला सुप्रीम कोर्टाकडून 31 मेपर्यंत स्थगिती

CBSE, ICSE 12th Exam SC Hearing|12 वी ची परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेला सुप्रीम कोर्टाकडून 31 मेपर्यंत स्थगिती

Published by :
Published on

सुप्रीम कोर्टाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनसाठी सीबीएसई, आयसीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने 31 मेपर्यंत स्थगिती दिली आहे. सीबीएसई आणि आयसीएसईच्या 12 वीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सोमवारी 31 मे 2021 रोजी सुनावणी होईल. देशातील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचे आदेश केंद्र सरकारला द्यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि सीबीएससीला या याचिकेची एक प्रत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात अ‍ॅडव्होकेट ममता शर्मा यांची याचिका
सर्वोच्च न्यायालयाच्या अ‍ॅडव्होकेट ममता शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेत केंद्र, माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा (सीआयएससीई) परिषदेला सीबीएसई आणि आयसीएसई इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्यास सांगितले आहे. या याचिकेमध्ये 300 विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र लिहिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com