कोरिओग्राफर गणेश आचार्य विरोधात विनयभंगप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र
प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यवर (Bollywood Choreographer Ganesh Acharya) यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. गणेश आचार्य आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध अंधेरी (Andheri) महानगर दंडाधिकारी न्यायालयात ओशिवरा पोलिसांनी(Oshiwara Police ) आरोपपत्र दाखल करण्यात आले. गणेश आचार्य आणि त्याच्या सहाय्यकावर कलम 354- अ (लैंगिक छळ), 354-क (व्हॉयरिझम), 345-ड (पाठलाग करणे), 509 (महिलेचा अपमान), 323 (दुखापत), 504 या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आचार्य हा २००९ ते २०१० पर्यंत शरीरसंबंध ठेवण्यास सांगत पॉर्न व्हिडीओ पाहण्याची सक्ती करीत असल्याचा पीडितेचा आरोप आहे.गणेश आचार्य यांना विरोध केल्यानंतर एका सभेत आपल्याला मारहाण झाल्याचीही तक्रार या महिलेने केली आहे. गणेश यांनी शिवीगाळ केली शिवाय मारहाण केली त्यानंतर मी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. पण पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यानंतर मी वकिलांच्या मदतीने आरोपपत्र दाखल केलं असल्याचं या महिलेने म्हटलंय.