APAAR: 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी' म्हणजे काय, विद्यार्थ्यांसाठी ते का आहे महत्त्वाचे?

APAAR: 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी' म्हणजे काय, विद्यार्थ्यांसाठी ते का आहे महत्त्वाचे?

आधार कार्डानंतर आता विद्यार्थ्यांसाठी अपार कार्ड बनवण्याची तयारी सुरू आहे. ही कार्ड फक्त विद्यार्थ्यांसाठी असतील आणि यातून त्यांना आयुष्यभर यातून अनेक फायदे मिळू शकतील.
Published on

What is Apaar Card : आधार कार्डानंतर आता विद्यार्थ्यांसाठी अपार कार्ड बनवण्याची तयारी सुरू आहे. ही कार्ड फक्त विद्यार्थ्यांसाठी असतील आणि त्यांची निर्मिती झाल्यानंतर त्यांना आयुष्यभर यातून अनेक फायदे मिळू शकतील. त्याची थीम वन नेशन, वन स्टुडंट आयडी म्हणजेच एका देशातील विद्यार्थ्यांसाठी फक्त एक प्रकारचा आयडी आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात राज्यांना संदेश पाठवला आहे. याअंतर्गत पालकांच्या संमतीने शाळांद्वारे विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. जाणून घ्या नक्की काय आहे ही योजना?

अपार म्हणजे काय?

याचा फुलफॉर्म ऑटोमोटेड परमानेंट अकेडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच AAPAR आहे. याला एज्युकेशन इकोसिस्टम रजिस्ट्री किंवा ‘एज्युलॉकर’ असेही म्हटले जाऊ शकते. ही प्रक्रिया NEP म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत देखील स्वीकारली जाईल. काही काळापूर्वी, NETF (नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम) च्या प्रमुखांनी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा समावेश करणारी एक प्रणाली तयार करण्याबद्दल विधान केले होते. म्हणजे शिक्षक, विद्यार्थी, महाविद्यालये आणि शाळा, सर्वकाही. याचा परिणाम अपार कार्ड म्हणता येईल.

ते कसे कार्य करेल?

अपार कार्ड प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक यूनीक आइडेंटिफिकेशन क्रमांक असेल. याचा उपयोग पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत करता येईल. याद्वारे, विद्यार्थ्याशी संबंधित सर्व डेटा एकाच ठिकाणी उपलब्ध होईल जो अपार कार्ड क्रमांकाद्वारे केव्हाही मिळवता येईल. विद्यार्थ्यांचा निकाल, महाविद्यालय, शाळा, यश, सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. ढोबळपणे सांगायचे तर, ही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासाची संपूर्ण नोंद असेल. ऑलिम्पियाडपासून ते कोणत्याही स्पेशल ट्रेनिंगपर्यंत किंवा विद्यार्थ्याने केलेले इतर काहीही, हा सगळा डेटा त्याद्वारे कळू शकतो. त्याच्या मदतीने, विद्यार्थ्याला शाळा किंवा महाविद्यालय बदलावे लागेल तेव्हा सर्वकाही सहज करता येईल आणि ते देशाच्या प्रत्येक भागात काम करेल.

शाळांना घ्यावी लागेल जबाबदारी

अपार कार्डमध्ये नावनोंदणीची जबाबदारी शाळांना उचलावी लागणार आहे. ते पालकांच्या संमतीने त्यांच्या मुलासाठी अपार कार्ड तयार करतील आणि जेव्हा पालकांना हवे असेल तेव्हा ते त्यांची संमती काढून घेऊ शकतात आणि त्यातून मुलाचा डेटा काढू शकतात. मात्र, हा डेटा चुकीच्या ठिकाणी वापरला जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले आहे. पण लोक डेटा सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com