१ फेब्रुवारीपासून होणार 'हे' मोठे बदल; सर्वसामान्यांवर थेट परिणाम

१ फेब्रुवारीपासून होणार 'हे' मोठे बदल; सर्वसामान्यांवर थेट परिणाम

जानेवारी महिन्याचा आज शेवटचा दिवस. यानंतर 2024 चा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी सुरू होईल. दर महिन्याप्रमाणे हा महिना सुरू होताच अनेक नियम बदलणार आहेत.
Published on

New Rules February 2024 : जानेवारी महिन्याचा आज शेवटचा दिवस. यानंतर 2024 चा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी सुरू होईल. दर महिन्याप्रमाणे हा महिना सुरू होताच अनेक नियम बदलणार आहेत. असे अनेक नवे नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. अशा परिस्थितीत, या बदलांबद्दल जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.

1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. यासोबतच फेब्रुवारी महिना सुरू होताच NPS पैसे काढणे आणि ऑनलाइन व्यवहारांशी संबंधित नवीन नियम लागू होणार आहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतीतील बदलांचाही समावेश आहे. येथे आम्ही तुम्हाला काही मोठ्या बदलांबद्दल सांगणार आहोत जे 1 फेब्रुवारीपासून होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया...

FASTag KYC नियमांमध्ये बदल

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने केवायसीशिवाय फास्टॅग काळ्या यादीत टाकण्याची किंवा निष्क्रिय करण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप तुमच्या फास्टॅगचे केवायसी अपडेट केले नसेल, तर ते त्वरित पूर्ण करा. असे न केल्यास फास्टॅगमध्ये शिल्लक असूनही ते बंद केले जाईल. एवढेच नाही तर केवायसी न केल्यास १ फेब्रुवारीपासून दुप्पट टोल भरावा लागेल. एनएचएआयचे हे पाऊल वन व्हेइकल वन फास्टॅग उपक्रमाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश अनेक वाहनांसाठी एकाच फास्टॅगचा वापर रोखणे हा आहे.

IMPS नियमांमध्ये मोठा बदल

तुम्ही ऑनलाइन व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. RBI नुसार, आता तुम्ही लाभार्थीचे नाव न जोडता IMPS द्वारे बँक खात्यातून 5 लाख रुपये ट्रान्सफर करू शकता. NPCI ने 31 ऑक्टोबर रोजी परिपत्रक जारी करून ही माहिती दिली होती.

पेट्रोल आणि डिझेलसह एलपीजीच्या किमतीत बदल

1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल होणार आहेत. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधनाचे दर बदलतात. अनेक दिवसांपासून तेल कंपन्यांनी राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

फेब्रुवारीमध्ये 11 दिवस बँका बंद राहतील

दर महिन्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातही अनेक दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. RBI ने राष्ट्रीय स्तरावर बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह विविध राज्यांमध्ये होणाऱ्या अनेक सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्याच्या २९ दिवसांपैकी ११ बँका बंद राहतील.

NPS काढण्यासाठी नवीन नियम लागू होतील

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने 12 जानेवारी 2024 रोजी एक परिपत्रक जारी करून राष्ट्रीय पेन्शन प्रणालीशी संबंधित नियमांमधील बदलांची घोषणा केली आहे. या अंतर्गत, नवीन पैसे काढण्याचे नियम सदस्यांसाठी लागू केले जाणार आहेत. त्यानुसार, 1 फेब्रुवारीपासून, NPS खातेधारकांना नियोक्ता योगदान वगळून केवळ 25 टक्के रक्कम काढण्याची परवानगी असेल. यासाठी खातेदारांना स्वघोषणासह पैसे काढण्याची विनंती सादर करावी लागेल. यानंतर, पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच जमा केलेली रक्कम काढता येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com