मोठी बातमी! पेटीएम बँकेच्या अनेक सुविधा बंद, तुमच्या खात्यात पैसे असतील तर...
Paytm : पेटीएम कंपनीला गेल्या काही वर्षांपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएमच्या अनेक सेवा तत्काळ बंद केल्या आहेत. आरबीआयच्या आदेशानुसार, आता पेटीएम पेमेंट्स बँक नवीन ग्राहक जोडू शकत नाही. यासोबतच सध्या पेटीएम पेमेंटचे ग्राहक आणि जे वॉलेट वापरत आहेत. ते 29 फेब्रुवारीनंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा करू शकणार नाहीत. विद्यमान ग्राहकांवर याचा काय परिणाम होईल ते जाणून घ्या...
आरबीआयने जारी केलेल्या आदेशानुसार आता पेटीएमची पेमेंट बँक नवीन ग्राहक जोडू शकत नाही. तथापि, या संदर्भात आरबीआयने स्पष्ट केले आहे की विद्यमान ग्राहक 29 फेब्रुवारीपर्यंत त्यांचे खाते पूर्णपणे पूर्वीप्रमाणे वापरू शकतात. म्हणजेच, जर तुम्ही पेटीएमद्वारे कोणतीही सुविधा घेतली असेल जसे फास्टॅग, कॉमन मोबिलिटी कार्ड किंवा पोस्टपेड कर्जाप्रमाणे तुम्ही ती सुविधा वापरू शकता. मात्र, यानंतर पेटीएमद्वारे कोणतीही सुविधा पुढे वापरता येणार नाही. म्हणजेच 29 फेब्रुवारीनंतर तुम्ही फास्टॅग, कॉमन मोबिलिटी कार्ड रिचार्ज करू शकणार नाही किंवा तुमच्या खात्यातून व्यवहार करू शकणार नाही. त्यामुळे या सुविधांचा लाभ घेत असाल तर २९ फेब्रुवारीपर्यंत त्यांचा पुरेपूर वापर करा.
RBI काय म्हणाले?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले की, सिस्टम ऑडिट आणि पूर्णता प्रमाणीकरण अहवालात पेटीएम अनुपालन मानकांकडे सतत दुर्लक्ष करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेत आणखी अनेक त्रुटी समोर आल्या आहेत, त्यामुळे पुढील कठोर कारवाई केली जाईल, असेही आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.