Jobs for Transgenders: पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी तृतीयपंथीयांचा मार्ग मोकळा
आता तृतीयपंथीय पीएसआय होऊ शकणार आहेत. मुख्य स्पर्धा परीक्षेतील चाचणीकरता मानके निश्चित करण्यात आली आहेत. शारीरिक चाचणीची मानके आणि गुण निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे.
‘स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता’ आणि ‘स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता’ शारीरिक चाचणीची मानके व गुण आयोगामार्फत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.
शारीरिक चाचणीचा तपशील
स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता
१) गोळा फेक- वजन- ७.२६० कि.ग्रॅ. कमाल गुण-१५
२) पुलअप्स- कमाल गुण-२०
३) लांब उडी- कमाल गुण-१५
४) धावणे (८०० मीटर)- कमाल गुण-५०
स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता
१) गोळा फेक- वजन- ४ कि.ग्रॅ.- कमाल गुण-२०
२) धावणे (४०० मीटर) – कमाल गुण-५०
३) लांब उडी- कमाल गुण-३०