IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करण्याची संधी, पाहा अर्ज कसा करायचा...
अनेक तरूण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. नोकरी मिळवण्यासाठी कायम प्रयत्नात असतात. अशाच तरूणांसाठी उत्तम संधी चालून आली आहे. इंटेलिजन्स ब्युरोनंमध्ये (Intelligence Bureau Of Recovery) भरती जाहीर केल्या आहेत. 600 हून अधिक पदांवर ही भरती जाहीर करण्यात आली असून या भरतीसाठी तुम्ही अर्ज करु शकता. गृह मंत्रालयाकडून इंटेलिजेंस ब्युरोमध्ये विविध पदांवर ही भरती जाहीर करण्यात आली आहे. सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO), सामान्य केंद्रीय सेवा (JIO) अशा विविध पदांवर भरती केली जाईल.
30 मार्च 2024 ला अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे आणि 29 मे 2024 हा अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला mha.gov.in. या वेबसाईटला भेट द्यावी लागेल
IB Recruitment 2024:
शैक्षणिक पात्रता (Educational Eligibility): या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बॅचलर पदवी असणे आणि सुरक्षा किंवा गुप्तचर विभागात दोन वर्षांचं अनुभव असणे आवश्यक आहे.
पगार (Salary): या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला पद आणि पात्रतेनुसार 19,900 रुपये ते 1,51,100 रुपये प्रति महिना पगार मिळेल.
वयोमर्यादा (Age Limit): गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा विविध पदांसाठी वेगवेगळी आहे. मात्र, उमेदवाराचे वय 54 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्जशुल्क (Application Fee): या भरतीसाठी उमेदवाराला 450 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. ओबीसी आणि EWS उमेदवाराला शु्ल्कात 100 रुपये सवलत मिळेल.
अर्ज कुठे पाठवायचा?: या पदांसाठी अर्ज ऑफलाइन प्रक्रियेने स्वीकारण्यात येईल. तुम्ही वेबसाइटवर दिलेल्या नोटिसमधून प्रोफॉर्मा डाउनलोड करा आणि तो भरा आणि खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: संयुक्त उप निदेशक/जी-3, इंटेलिजेंस ब्यूरो, गृह मंत्रालय, 35 एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021.