Govt Jobs 2023 : बारावी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची संधी; पाहा कुठे?
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)नं गुड न्यूज दिली आहे. या आयोगाकडून या विद्यार्थ्यांसाठी भरतीय परीक्षेचं नोटिफिकेशन प्रसिद्ध केलंय. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळत आहे.
बुधवारी (2 ऑगस्ट) रोजी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने स्टेनोग्राफर भरती परीक्षेचं नोटीफिकेशन प्रसिद्ध केलंय. अर्ज करण्यासाठी 23 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात याबाबतची पहिल्या टप्प्यातली परीक्षा होणार आहे.
काय आहेत निकष?
एसएससीनं स्टेनोग्राफर पदासाठी तुम्हाला https://ssc.nic.in/ या वेबसाईटवर अर्ज करावा लागेल. ही परीक्षा दोन टप्प्यात होईल. यामधील पहिला टप्पा हा कॉम्पयुटरवर आधारीत परीक्षेचा असेत. तर दुसऱ्या टप्प्यात स्किल टेस्ट होईल. या भरतीसाठी पहिल्या टप्प्याची परीक्षा 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी होईल.
कसा असेल पगार?
स्टेनोग्राफर ग्रुप सी
पे स्केल - 9300-34800
पे बँड - 4200 किंवा 4600 (वेतन ग्रेड 2)
सुरुवातीचा पगार - 5200
बेसिक पे - 14500