दहावी पास उमेदवारांसाठी मोठी भरती, सेंट्रल बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी

दहावी पास उमेदवारांसाठी मोठी भरती, सेंट्रल बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. बंपर भरतीला सुरूवात झालीये. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही संधी आहे.
Published by :
shweta walge
Published on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. बंपर भरतीला सुरूवात झालीये. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही संधी आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. सरकारी नोकरी करण्याचे दहावी पास असणाऱ्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहेत. ही भरती प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे. या तारखेपर्यंत उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

ही भरती प्रक्रिया सेंट्रल बँकेकडून राबववी जात आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. ही एक बंपर भरती आहे. सब-स्टाफ या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

ही भरती प्रक्रिया तब्बल 484 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. centralbankofindia.co.in साईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला अर्ज करावा लागेल. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती मिळेल.

उमेदवारांची निवड ही परीक्षेतून केली जाणार आहे. विशेष म्हणजे परीक्षा ही विविध भाषांमध्ये होणार आहे. तुम्ही मराठीमध्येही परीक्षा देऊ शकता. या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 18 ते 26 असणे आवश्यक आहे. दहावी पास असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

दहावी पास उमेदवारांसाठी मोठी भरती, सेंट्रल बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी
Secret Santa Gift Ideas : तुम्ही कुणाचे सिक्रेट सांता असाल तर 'ही' गिफ्ट्सची लिस्ट एकदा पाहाच

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 850 रूपये फिस ही भरावी लागेल. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फिसमध्ये सूट देण्यात आलीये. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच इच्छुकांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com