EPFO चा मोठा निर्णय! 'आधार कार्ड'ला आता जन्मतारखेचा पुरावा मानलं जाणार नाही

EPFO चा मोठा निर्णय! 'आधार कार्ड'ला आता जन्मतारखेचा पुरावा मानलं जाणार नाही

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचे एक नोटिफिकेशनच ईपीएफओने प्रसिध्द केले आहे.
Published on

EPFO Update : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मोठा निर्णय घेतला आहे. आता तुमच्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड वैध राहणार नाही. याबाबतचे एक नोटिफिकेशनच ईपीएफओने प्रसिध्द केले आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या निर्देशांनंतर, ईपीएफओने जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

युआयडीएआयने 22 डिसेंबर 2023 रोजी म्हटले होते की, पडताळणीनंतर व्यक्तीची ओळख प्रस्थापित करण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जाऊ शकतो परंतु तो जन्मतारखेचा पुरावा नाही, असे स्पष्ट केले होते. यानंतर ईपीएफओने वैध कागदपत्रांच्या यादीतून आधार कार्ड काढून टाकलं आहे. याऐवजी आता जन्म आणि मृत्यू निबंधकाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र (Birth certificate), मान्यताप्राप्त सरकारी मंडळ किंवा विद्यापीठाने जारी केलेले गुणपत्रक (Marksheet), पॅन कार्ड यांसारखी कागदपत्रे जन्मतारखेचा वैध पुरावा म्हणून वापरली जातील.

दरम्यान, ईपीएफओने घेतलेल्या या निर्णयाचा थेट परिणाम देशातील करोडो ​​ग्राहकांवर होणार आहे. या निर्णयानंतर तुम्ही जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड वापरू शकणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com