Budget 2022 | डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर अधिक भर दिला जाणार – अर्थमंत्री

Budget 2022 | डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर अधिक भर दिला जाणार – अर्थमंत्री

Published by :
Published on

Budget 2022 : कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था काही प्रमाणात ढासाळलेली दिसून आली. तशी सगळ्याच थरातील लोकांना आहे. कोरोना काळात अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.

दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेने पाच लाख कोटी डॉलरचा महत्त्वाकांक्षी टप्पा ओलांडायचा झाल्यास पायाभूत सेवा-सुविधांवर 1.4 लाख कोटी डॉलर खर्च करण्याची गरज असल्याचे सोमवारी प्रसिद्ध झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले. त्यामुळे या अर्थसंकल्पात सामान्यांना दिलासा मिळणार काय, याची उत्सुकता आहे.

२०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन सांगितले की, डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. देशाचा विकास दर ९.२७ टक्के असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. इतक नाही तर पुढील पाच वर्षात ६० लाख नवे रोजगार निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com