Business
BSE | सेन्सेक्सचा विक्रमी उच्चांक
मुंबई शेअर बाजारात बुधवारी मोठा उसळी पाहायला मिळाली. मुंबईत निर्देशाकने उच्चांक गाठलेला पाहायला मिळाला. निर्देशकात तब्बल २७० अंकांनी उसळी घेतली आहे. सेन्सेक्स ५६ हजार ०९९ वर गेला आहे. त्यापाठोपाठ निफ्टी ५० नं देखील ८० अंकांची वाढ नोंदवत १६ हजारांचा टप्पा पार केला आहे. निफ्टीनं १६ हजार ७०१ पर्यंत झेप घेतली आहे.
काल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिनं तब्बल ८ महिन्यांनंतर एचडीएफसी बँकेला ग्राहकांसाठी पुन्हा क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम देखील शेअर बाजारात दिसून आल्याचं अभ्यासकांचं मत आहे.
आज सकाळी शेअर बाजार उघडला, तेव्हाच Nifty50 टक्क्यांची वाढ नोंदवत १६ हजार ६७८.९५ अंकांपर्यंत मजल मारली. त्याच वेळी सेन्सेक्स ०.४३ टक्क्यांनी वधारत ५६ हजार ०३२.०३ पर्यंत पोहोचला होता.