केरळमध्ये बर्ड फ्लू; बदके, कोंबड्यांना मारण्याचे आदेश
कोरोनानंतर आता महाराष्ट्रावर आणखी एक मोठं संकट ओढावण्याची शक्यता आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्य बर्ड फ्लू ची (Bird Flu H5N8) साथ पसरली आहे. या साथीत आतापर्यंत हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील थाकाझी पंचायतमधून बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याची माहिती आता समोर आली आहे. पुरक्कडमधून पाठवण्यात आलेल्या बदकांमध्ये बर्ड फ्लू असल्याची पुष्टी झाली आहे. याबाबत सूचना मिळताच अधिकाऱ्यांनी प्रभावित भागात एक किलोमीटरपर्यतच्या भागातील बदके, कोंबड्या यांना मारण्याचे आदेश दिले आहेत. फ्लूच्या प्रकोपाची सूचना मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी पशूपालन, आरोग्य आणि पोलिस विभागातील अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. याशिवाय राजस्थानमधील नागोर जिल्ह्यातूनही बर्ड फ्लूची प्रकरणं समोर आली आहेत. .यामध्ये 5 दिवसांत 60 हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला होता.