बिपिन रावत यांचा लष्करी प्रवास; 1978 ‘बेस्ट कॅडेट’ ते 2016 साली लष्करप्रमुख

बिपिन रावत यांचा लष्करी प्रवास; 1978 ‘बेस्ट कॅडेट’ ते 2016 साली लष्करप्रमुख

Published by :
Published on

तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे MI17V5 विमान कोसळले. भारतीय वायुसेनेच्या या हेलिकॉप्टरध्ये देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १४ लष्करी अधिकारी उपस्थित होते. या अपघातात मृतांचा आकडा 11 वर गेला आहे. तर सीडीएस रावत गंभीर जखमी आहेत. दरम्यान बिपिन रावत यांचा लष्करी प्रवास थोडक्यात जाणून घेऊयात…

बिपिन रावत हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. सीडीएसचे काम लष्कर दल आणि नौदल यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक आहेत. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे आहे.

1978 'बेस्ट कॅडेट' ते 2016 साली लष्करप्रमुख

  • 2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक करण्यात आली होती.
  • बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.
  • बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले होते.
  • रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले 'बेस्ट कॅडेट' ठरले.
  • रावत यांना 'स्वार्ड ऑफ ऑनर' या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.
  • इतकंच नाही सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी रावत यांना गौरवण्यात आलं आहे.

शत्रूंशी थेट भिडणारे अधिकारी
रावत हे शत्रूंशी थेट भिडणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना त्यांनी थेट आव्हान दिलं होतं. तसेच घुसखोरी केल्यास जमिनीत गाडू, अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. सोबतच मी माझ्या सैनिकांना लढायला सांगू शकतो, मरायला नाही असं देखील रावत यांनी म्हटलं होतं.

शिक्षण
बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एलएस रावत हेदेखील लष्करात होते आणि ते लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून ओळखले जात होते. त्यांचं बालपण सैनिकांमध्ये गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यातल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले. त्यांची तिथली कामगिरी पाहून त्यांना पहिलं सन्मानपत्र मिळालं, ज्याला SWORD OF HONOURनं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला.

सन्मान
बिपिन रावत यांना सैन्यात अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com