बिल गेट्स आणि मेलिंडा घेणार घटस्फोट

बिल गेट्स आणि मेलिंडा घेणार घटस्फोट

Published by :
Published on

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असणाऱ्या बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नानंतर २७ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या दोघांनीही एक संयुक्त पत्रक जारी केलं. यापुढे आम्ही दोघं एकत्र राहू शकत नाही, असं स्पष्ट केलं आहे. बिल गेट्स आणि मेलिंडा यांचं लग्न १९९४ साली झालं होतं.

बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. बिल यांनी सोशल मीडियावर ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये त्यांनी, "बऱ्याच चर्चेनंतर आणि आपल्या नात्यावर बरंच काम केल्यानंतर आता आम्ही लग्नबंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २७ वर्षांमध्ये आम्ही आमच्या तीन मुलांना एकत्र वाढवलं. आम्ही एक फाऊण्डेशन तयार केलं जे जगभरातील लोकांना आरोग्य सुविधा आणि चांगलं राहणीमान देण्यासाठी प्रयत्न करत आहे," असं म्हटलंय.

बिल आणि मेलिंडा यांची पहिली भेट १९८७ साली झाली होती. त्यावेळी मेलिंडा यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. सन १९९४ मध्ये या दोघांनी हवाई बेटांवरील लानी बेटावर लग्न केलं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com