‘बेस्ट’ कामगिरी! चालक-वाहकाच्या प्रसंगावधानामुळे फिट आलेल्या चिमुकल्याचे वाचले प्राण
जुई जाधव | बेस्टच्या वाहक आणि चालकाने (Best Bus) दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका चिमुकल्याचे जीव वाचला (Save boy life) आहे. बसमध्ये प्रवास करताना चिमुकल्याला अचानक फिट आली होती. या घटनेची माहिती वाहक आणि चालकाला मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट बस हॉस्पिटलच्या दिशेने वळवली.यावेळी वेळेत मिळालेल्या उपचारामुळे चिमुकल्याचे प्राण वाचले आहे. कामगिरी आता या दोन्ही चालक वाहकाचे सर्व स्तरावरून कौतूक होत आहे.
गोरेगाव ते नेहरू तारांगण (Goregaun to Nehru Tarangan) या मार्गावर चालणारी बस मार्ग क्रमांक 33 दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी सिटीलाईट बस (Citylight Bus Stop) थांब्यावरून पुढे निघाली होती. या थांब्याच्या पुढे सिग्नल जवळ पोहोचताच पुजा पारकर नामक प्रवासी महिला जोरजोराने ओरडत होती. महिलेची आरडाओरड बस चालक आणि बस वाहक यांना ऐकू येताच चालक-वाहकाने महिले जवळ जाऊन परिस्थीती पाहिली असता पुजा पारकर यांच्या सोबत असलेल्या चार ते पाच वर्षीय शिवम पारकर याला अचानक फिट आली होती आणि त्याची दातखिळी बसली होती. सदर घटना मंगळवारी २२ मार्च २०२२ रोजी घडली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, तसेच येथून जाणाऱ्या सहाय्यक वाहतूक अधिकारी राजेश विचारे यांनी बस वाहक आप्पासाहेब लोहार आणि बसचालक किशोर दाणे यांना प्रसंगाचे गांभीर्य ओळखून सदर बस ठाकूर हॉस्पिटलच्या (Thakur Hospital) दिशेने वळवण्याचे आदेश दिले. त्यानुसार क्षणाचाही विलंब न लावता लोहार आणि दाणे यांनी तातडीने बस ठाकुर हॉस्पिटलला नेली. शिवम पारकर याला उपचार देण्यासाठी मदत केली. शिवमला वेळेत उपचार मिळाल्याने याचे प्राण वाचले. बस वाहक आप्पासाहेब लोहार आणि बसचालक किशोर दाणे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधाने शिवमचे प्राण वाचले.
दरम्यान बस वाहक आप्पासाहेब लोहार आणि बसचालक किशोर दाणे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधाने सर्व स्तरावरून कौतूक होत आहे. तसेच या दोघांच्या कामगिरीची दखल (Best Bus) बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी घेत लोहार आणि दाणे यांचा कार्यालयात बोलावून विशेष सत्कार केला.