Belgaum Municipal Election Results 2021 | बेळगाव महापालिकेवर  फुललं कमळ, महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव

Belgaum Municipal Election Results 2021 | बेळगाव महापालिकेवर फुललं कमळ, महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव

Published by :
Published on

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. भाजप, काँग्रेस बरोबर आप, एमआयएम, निधर्मी जनता दल देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्राचे संपूर्ण लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता काबीज केली आहे. भाजप ने तब्बल आठ वर्षानंतर महापालिकेवर निर्विवादपणे विजय मिळवला आहे.

भाजपने महाराष्ट्र एकीकरण समितीचा पूर्णपणे धुरळा उडवला आहे. या निवडणुकीत भाजपनं 35, काँग्रेसने 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 4 आणि एम आय एम १ असे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भाजपाने या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि जोरदार प्रचार केला होता. ५८ प्रभागांच्या बेळगाव महापालिकेसाठी ३८५ उमेदवार रिंगणात उभे होते. दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचे राऊतांनी बोलून दाखवलेले स्वप्न मात्र आता पूर्णपणे भंगले आहे.

या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. दरम्यान, बेळगावमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता येईल असा संपूर्ण महाराष्ट्राला विश्वास आहे. तिथले मराठी भाषिक एकत्र आले आहेत आणि पुन्हा पालिकेवर भगवा ध्वज फडकवतील. आमच्या मनात जे आहे तेच व्हाव अशी आशा आम्ही करतो, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर भाजपाने बेळगाव महापालिकेवर सत्ता मिळवली आहे.

विजयी उमेदवारांची यादी…

Ward No. – Winner – Party
1 Usha Chavan BJP
2 Muzamil Doni Congress
3 Jyoti Kadolkar Congress
4 Jayterth Saundatti BJP
5
6 Santosh Pednekar BJP
7
8 sohail sangolli cong
9
10
11 Samiulla Madiwale Congress
12 Madinsahab Matwale Independent
13
14 Shivaji Mandolkar Independent
15 Netravati BJP
16 Shivaji Bhatkande BJP
17
18 Sahidkhan Pathan AIMIM
19 Riyaz Killedar Independent
20
21 Priti Kamkar BJP
22 Raviraj Sambrekar BJP
23 Jayant Jadhav BJP
24
25 Zarina Fatekhan Independent
26 Rekha Hugar BJP
27 Ravi Salunkhe Independent
28 Ravi Dhotre BJP
29 Nitin Jadhav BJP
30 Nandu Mirajkar BJP
31 Mina Vijapure BJP
32
33
34
35 Laxmi Rathod BJP
36 Rajshekar Doni BJP
37
38 Mohd Patwegar Independent
39
40 Reshma Kamkar BJP
41 Mangesh Pawar BJP
42 Abhjijeet Jawalkar BJP
43
44
45 Rupa chikaldani BJP
46
47 Asmita Patil Independent
48
49 Deepali Topagi BJP
50 sarika patil bjp
51
52 Khurshia Mulla Congress
53
54 Madhavi Raghochi BJP
55
56
57 Shobha Somnache BJP
58

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com