Bank Holidays in October | नवरात्रीपासून 17 दिवस बँका बंद, पाहा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays in October | नवरात्रीपासून 17 दिवस बँका बंद, पाहा सुट्ट्यांची यादी

Published by :
Published on

देशभरात उद्या 7 ऑक्टोबर 2021 पासून नवरात्री सुरू होत आहे. या दरम्यान अनेक दिवस बँकांमध्ये कोणतेही सामान्य काम होणार नाही. त्यामुळे बँकेला भेट देऊन कोणतेही काम करायचे असेल तर घर सोडण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहा.

भारतीय रिझर्व्ह बँकच्या वेबसाईटनुसार,उद्यापासून देशभरात एकूण 17 दिवसांच्या बँक सुट्ट्या असतील. मात्र, या 17 सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिल्या जातील. पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी. या 17 दिवसांच्या सुट्ट्यांपैकी 13 दिवस RBI ने सुट्ट्या दिल्यात. तुमच्या राज्यानुसार, कोणत्या दिवशी बँका बंद राहतील हे जाणून घ्या.

  • हरियाणातील बँका 7 ऑक्टोबर रोजी महाराजा अग्रसेन जयंतीला बंद राहतील.
  • दुसरा शनिवार असल्याने 9 ऑक्टोबर रोजी देशभरातील बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.
  • रविवारच्या सुट्टीमुळे 10 ऑक्टोबर रोजी देशभरातील बँका बंद राहतील.
  • दुर्गापूजा महासप्तमीमुळे 12 ऑक्टोबरला आगरतळा आणि कोलकातामध्ये बँका बंद राहतील.
  • 13 ऑक्टोबर रोजी दुर्गापूजा महाअष्टमीमुळे आगरतळा, कोलकाता तसेच भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, पाटणा आणि रांची येथे बँका बंद राहतील.
  • 14 ऑक्टोबर रोजी दुर्गापूजा महानवमीच्या निमित्ताने आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, लखनऊ, शिलाँग, श्रीनगर, तिरुअनंतपुरम, पाटणा आणि रांची येथे बँक सुट्टी असेल.
  • 15 ऑक्टोबर रोजी दसऱ्याला देशभरातील बँका बंद राहतील. मात्र, या दिवशी इम्फाळ आणि सिमल्यात बँकांमध्ये काम होईल.
  • दुर्गापूजेमुळे 16 ऑक्टोबर रोजी गंगटोकमध्ये बँका बंद राहतील.
  • यानंतर 17 ऑक्टोबर रोजी रविवारच्या सुट्टीमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
  • तसेच 18 ऑक्टोबर रोजी गुवाहाटीच्या बँका बंद राहतील.
  • ईद-ए-मिलादच्या दिवशी 19 ऑक्टोबर रोजी बँका बंद राहतील
  • ईद-ए-मिलादमुळे 19 ऑक्टोबर रोजी बँका बंद राहतील. अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, देहरादून, हैदराबाद, इंफाल, जम्मू, कानपूर, कोची, लखनऊ, मुंबई, नागपूर, दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम येथील बँका या दिवशी बंद राहतील.
  • महर्षी वाल्मिकी जयंतीला आगरतळा, बेंगळुरू, चंदीगड, कोलकाता आणि शिमला येथील बँका 20 ऑक्टोबर रोजी बंद राहतील.
  • ईद-ए-मिलाद नंतर पहिला जुम्मा असल्याने, 22 ऑक्टोबर रोजी जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँकेला सुट्टी असेल.
  • त्यानंतर 23 ऑक्टोबर, चौथा शनिवार आणि 24 ऑक्टोबर रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
  • जम्मू-श्रीनगरमध्येही 26 ऑक्टोबर रोजी बँका बंद राहतील.
  • रविवारच्या सुट्टीमुळे देशभरातील बँका 31 ऑक्टोबर रोजी बंद राहतील.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com