सर्व्ह विथ श्रद्धा
सर्व्ह विथ श्रद्धा

‘सर्व्ह विथ श्रद्धा संस्थे’च्या माध्यमातून महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेसंबंधी जनजागृती उपक्रम

Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सर्व्ह विथ श्रद्धा संस्थेच्या माध्यमातूनत १८ फेब्रुवारी रोजी द क्यूब, अंधेरी मरोळ येथे महिलांसाठी जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांसाठी वैयक्तिक स्वच्छता व योग्य आहाराचे फायदे यासंबंधी जनजागृती करण्यात आली. तसेच लठ्ठपणा, अनियमित पीरियड्स, मुरुमांमागील कारणे (पीसीओडी) समस्येवरील प्रतिबंधात्मक उपायासंबंधी चर्चाही यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी डॉ. स्मिता काळे यांनी वैयक्तिक स्वच्छतेबद्दल आपले मत मांडले आणि पीसीओडीपासून कसा बचाव करता येईल याविषयक माहिती दिली. सूर्य-नमस्कारासारखे व्यायाम प्रकार, आरोग्यदायी आहार आणि अस्वच्छता टाळण्यासाठी शरीराच्या गुप्त अवयवांची निगा राखणे इ. गोष्टींचे महत्व त्यांनी समजावून सांगितले. डॉ.स्मिता काळे यांनी आपला झोपडपट्टीत राहण्यापासून ते एक यशस्वी डॉक्टर असा प्रेरणादायी प्रवासही सांगितला, जो स्त्रिया-आणि मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणारा आहे.

सर्व्ह विथ श्रद्धा
सर्व्ह विथ श्रद्धा

श्रद्धा सिंग सर्व्ह विथ श्रद्धा संस्थेच्या संस्थापिका म्हणाल्या कि, 'आरोग्य हीच धनसंपदा' त्यामुळे मला महिलांमध्ये जनजागृती करायची आहे. स्त्रिया व मुलींचे सर्वदृष्टीने सक्षमीकरण हे सर्व्ह विथ श्रद्धाचे ध्येय आहे. वाढत्या वयात मुलींना अनेक आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागते. लहान वयातून स्त्रीत्वाकडे वाटचाल करताना त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. या प्रश्नांबद्दल बोलणे आपल्या समाजात टाळले जाते आणि त्यामुळे त्या आपल्या समस्या इतरांना सांगू शकत नाहीत. परिणामी, या समस्या आणखीन अवघड होऊन आरोग्याच्या दृष्टिने गंभीर बनतात. योग्य वयातच योग्य ज्ञानातून मुलींचे आयुष्य अधिक सुखकर बनू शकते, असा त्यांचा विश्वास आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com