Attack on Owaisi: ओवैसींवरील हल्ल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत बोलणार

Attack on Owaisi: ओवैसींवरील हल्ल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत बोलणार

Published by :
Published on

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भाषणावर उत्तर देणारं भाषण करणार आहेत तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्यसभेमध्ये 'एमआयएम' पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात भाष्य करणार आहेत. त्यामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन हे चांगलेच गाजणार आहे.

उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर ३ फेब्रवारी रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचा दावा ओवैसी यांनी केला. हा संपूर्ण प्रकार टोलनाक्यावरील सीटीटीव्हीमध्ये कैद झाला. "माझ्या वाहनावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी. बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) तरतुदींनुसार हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी आणि या देशातील कट्टरतावादाचा अंत करावा,' असं ओवैसी म्हणाले होते.

यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज राज्यसभेमध्ये ११ वाजून १० मिनिटांनी तर दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी लोकसभेमध्ये ओवैसी यांच्या वाहनावर झालेल्या गोळीबारासंदर्भात माहिती देणार आहेत. या हल्ल्याच्या घटेनंतर ओवैसी यांना केंद्र सरकारने दिलेली झेड दर्जाची सुरक्षा त्यांनी नाकारली असल्याने त्यावरही गृहमंत्री भाष्य करण्याची शक्यता आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com