Asia’s Richest Person: अंबानींना मागे टाकत गौतम अदानी ठरले जगातील सर्वात कोट्यधीश

Asia’s Richest Person: अंबानींना मागे टाकत गौतम अदानी ठरले जगातील सर्वात कोट्यधीश

Published by :
Published on

अंबानी नाही तर गौतम अदानी ठरले जगातील सर्वात वेगाने संपत्ती वाढणारे कोट्याधीश. अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी हे आता आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

संपत्तीच्या बाबतीत त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकलं आहे. मागील बऱ्याच काळापासून या दोघांमध्ये आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये चुरस दिसून येत होती.

ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने म्हटलंय की, बंदरे, विमानतळं, खाणी आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात काम करणाऱ्या अदानी समूहाचे प्रमख असणाऱ्या गौतम अदानींची एकूण संपत्ती मंगळवारी ८८.५ बिलियन डॉलर्स इतकी झाली. यासोबत अंबानींची एकून संपत्ती ही ८७.९ बिलीयन डॉलर्स इतकी आहे. अदानींच्या खासगी संपत्तीमध्ये १२ बिलीयन डॉलर्सची वाढ झाली असून ते यंदाच्या वर्षातील सर्वाधिक संपत्ती वाढ झालेले श्रीमंत व्यक्ती ठरलेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com